मुंबई : प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला बुधवार (दि. 16)पासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर नवे सरकार सज्ज झाले असून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहात आयोजित चहापान कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे व सहकारी आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात उठाव केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर मुख्यमंत्रीपदी शिंदे व उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. महिनाभराने मंत्रिमंडळ विस्तार होऊन लगोलग खातेवाटपही झाले. या सरकारमध्ये अनेक अनुभवी मंत्र्यांचा समावेश आहे.
यंदाचे पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून मुंबई येथील विधान भवनात सुरू होणार असून 25 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या कालावधीत 20, 21, 22 ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत, तर 24 ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
Check Also
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सात कोटी 11 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ
शेकाप, उबाठाचे कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघात किमानपाच हजार कोटी रुपयांचा निधी …