Breaking News

कुकशेतमध्ये रंगणार दहीहंडी उत्सव

नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार

नेरूळ नोडमधील कुकशेत गावात दहीहंडी उत्सवाचा थरार रंगणार असून शुक्रवारी (दि. 19) कुकशेत गावातील गांवदेवी मैदानात या उत्सवाचे आयोजन माजी नगरसेवक सुरज पाटील व सुजाता सुरज पाटील यांनी केले आहे. जय गजानन मित्र मंडळ आयोजित खुल्या गटामध्ये दहीहंडी फोडणार्‍यास 25 हजार रूपये रोख पारितोषिक, पारंपारिक मानाची दहीहंडी फोडणार्‍यास पाच हजार रुपये, दहीहंडीस सलामी देणार्‍या पथकांना एक हजार रूपये पारितोषिक देण्यात येणार आहे. या दहीहंडी उत्सवामध्ये ऐरोलीचे आमदार गणेश नाईक, बेलापुरच्या आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, जयवंत सुतार, भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, समाजसेवक गणेश भगत, माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे, माजी नगरसेविका रूपाली भगत, श्रध्दा गवस, स्नेहा पालकर, माजी परिवहन सभापती प्रदीप गवस यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभोवतालचे रहीवाशी व ग्रामस्थ सहभागी होणार आहेत.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply