हरारे : वृत्तसंस्था
केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौर्यावर दाखल झाला आहे. तीन वन डे सामन्यांची मालिका गुरुवार (दि. 18)पासून सुरू होत आहे. आशिया चषक स्पर्धेआधी ही मालिका टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे.
अनुभवी फलंदाज राहुलला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वैद्यकीय पथकाने तंदुरुस्त जाहीर केल्यानंतर आगामी झिम्बाब्वे दौर्यासाठी त्याची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. झिम्बाब्वेमध्ये होणार्या तीन सामन्यांच्या (18, 20, 22 ऑगस्ट) एकदिवसीय मालिकेसाठी आधी शिखर धवनकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते, पण राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आल्याने धवन उपकर्णधारपद सांभाळेल.
दुसरीकडे नियमित कर्णधार क्रेग एव्र्हाइन पायाच्या दुखापतीमुळे भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी मुकणार असून यष्टीरक्षक-फलंदाज रेगिस चकब्वा झिम्बाब्वेचे नेतृत्व करेल.
भारतीय संघ : केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाज अहमद.
झिम्बाब्वे संघ ः रेगिस चकाब्वा (कर्णधार), रायन बर्ल, तनाका चिवांगा, ब्रॅडली इव्हन्स, ल्यूक जोंगवे, इनोसंट काया, टी. कैटानो, क्लाइव्ह मडांडे, वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे मारुमनी, जॉन मसारा, टोनी मुन्योंगा, रिचर्ड एन्गरावा, व्हिक्टर एनयाउची, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, डोनाल्ड टिरिपानो.
सुंदरच्या जागी शाहबाज
झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच संघात समावेश झालेला वॉशिंग्टन सुंदर जखमी झाला आहे. त्यामुळे तो मालिकेत खेळू शकणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सुंदरच्या जागी अष्टपैलू शाहबाज अहमदचा संघात समावेश केला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणार्या शाहबाजला पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळाले आहे. 27 वर्षीय शाहबाज अहमदने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 47.28 सरासरीने धावा केल्या आहेत, तर त्याची गोलंदाजी सरासरी 39.20 इतकी आहे.
Check Also
पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …