Breaking News

पेणमध्ये तिरंगा रॅलीला लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद

पेण : प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पेणमधील पत्रकार व महात्मा गांधी स्मारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तिरंगा रॅलीत सर्व राजकीय पक्ष व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच विद्यार्थी व  नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.पेण शहरातील गांधी वाचनालयापासून निघाली ही तिरंगा रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, महावीर मार्ग, राजू पोटे मार्ग, एसटी स्थानक मार्गे नगर परिषद चौकात आली तेथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. भारत माता की जय, जय जवान जय किसान, भारतीय स्वातंत्र्याचा विजय असो, भारताचे संविधान भारताचे अभिमान अशा विविध घोषणा या तिरंगा रॅलीत देण्यात आल्या.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply