नवी दिल्ली : वृत्तसंस्था
झुलन गोस्वामीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज इंग्लंड विरूद्धच्या तिसर्या वनडे सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. याबाबतचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.
इंग्लंड दौर्यासाठी नुकताच भारतीय महिला संघ घोषित झाला. या संघात भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिचा देखील समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे झुलनला महिला वनडे वर्ल्डकपनंतर विश्रांती देण्यात आली होती. ती वर्ल्डकपमधील श्रीलंकेविरूद्धचा सामना देखील खेळली नव्हती. दरम्यान, आता ती इंग्लंड दौर्यावर 24 सप्टेंबरला लॉर्ड्सवर होणार्या तिसर्या आणि शेवटच्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.
झुलन गोस्वामी महिला क्रिकेटमध्ये सर्व क्रिकेट फॉरमॅटमध्ये मिळून सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. तिच्या नावावर सध्या 352 विकेट्स आहेत.
Check Also
पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्या प्रयोगशाळांवर कारवाई करणार
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्या …