Breaking News

दोन अपघातात दोन ठार, दोन जखमी

खोपोली, महाड : प्रतिनिधी
खोपोली-पेण रस्त्यावर रानसई गावाजवळ बुधवारी (दि. 31)झालेल्या अपघात कंटेनरचालकाचा मृत्यू झाला, तर  मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव गाव हद्दीत गुरुवारी (दि. 1) पहाटे झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून दोन जण जखमी झाले.
खोपोली-पेण रस्त्यावर रानसई गावाजवळ वळण रस्त्यावर कंटेनर अनियंत्रित होऊन उलटला. कंटेनरमधील पाईप चालकाच्या केबिनमध्ये घुसल्याने चालक अडकून पडला होताा. अपघाताची माहिती मिळताच खोपोली आपत्कालीन मदत गु्रपचे सदस्य, पोलीस यंत्रणा व स्थानिकांनी मदतकार्य केले. त्यांनी अडकलेल्या चालकाला बाहेर काढले, मात्र त्याचा मृत्यू झाला.
दुसर्‍या अपघातात गुरुवारी सकाळी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव गाव हद्दीत मुंबईहून गोवाकडे जाणारा कंटेनर (क्र. एमएल 01 जी 5635) हा महाड कडून मुंबईकडे जाणार्‍या आयशर टेम्पो (क्र. एमएच 06 बीडी 1378) यावर विरुद्ध दिशेला येऊन आपटला. या धडकेत आयशर टेम्पोचालक अशोक गोविंद बारगीर रा. दासगाव महाड जागीच ठार झाला, तर टेम्पोमधील प्रवासी महफुज मजिदुल्ला खान रा. नागलवाडी महाड आणि कंटेनरचालक दिनेश कुमार बीजनाथ यादव रा. बिहार हे दोघे जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जवळपास दीड तास कंटेनरचालक अडकला होता. अपघाताची माहिती मिळताच महाड शहर पोलीस निरीक्षक एम. पी. खोपडे, महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाडचे पोलीस हवालदार मंदार लहाने यांनी घटनास्थळी पोहचून जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघात प्रकरणी कंटेनरचालक यादव याच्यावर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply