उरण ः वार्ताहर
उरण तालुक्यातील महत्त्वाच्या अशा केगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील काँग्रेस, शेकाप आणि शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोमवारी (दि. 28) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या केगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच विविध पक्षांच्या पदाधिकार्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याने केगाव ग्रामपंचायत हद्दीत भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली आहे. केगाव ग्रामपंचायत हद्दीतील बाजारपूर येथील काँग्रेस, शेकाप व शिवसेना पदाधिकारी सुमित पाटील, कुणाल पाटील, प्रसन्न पाटील, सुरज ठाकूर, साहिल घरत, दुर्वेश म्हात्रे, सिद्धेश घरत, आदित्य पाटील, दिनेश ठाकूर, हर्षद थळी, योगेश म्हात्रे, सागर पाटील, अतिष लेपकर, अभिजित मोकळ, अक्षय मोकळ, अक्षय पाटील, हितेश पाटील, अशोक पाटील (दांडा) आदी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.
आमदार महेश बालदी यांनी सर्वांचे स्वागत केले. या वेळी भाजप तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, भाजपचे तालुका सरचिटणीस सुनील पाटील, उरण शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, केगाव भाजप उपाध्यक्ष अंकित म्हात्रे, गणेश पाटील, विराज म्हात्रे, मिथुन पुरव, युवा अध्यक्ष प्रसाद पाटील, हितेश शाह, अक्षय पाटील, अरविंद पवार, उदय म्हात्रे, बाबू काठे आदी उपस्थित होते.
Check Also
वाढदिवसानिमित्त युवा नेते परेश ठाकूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
पनवेल : रामप्रहर वृत्तहसतमुख स्वभाव, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची कार्यपद्धती आणि राजकारणापेक्षा समाजसेवेला प्राधान्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper