सुधागड : नाशिकच्या पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत पालीतील अनुज सरनाईकने 85 ते 90 वजनी गटात फाईटमध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे, तसेच ग्रुप इव्हेंटमध्येसुद्धा सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत एकूण 36 जिल्हे आणि 10 क्लबमधील 800 खेळाडूंचा सहभाग होता. ग्रुप इव्हेंटमध्ये अनुजव्यतिरिक्त अंशुल कांबळे, वैभव काळे यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. या यशाबद्दल इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले व अन्य मान्यवरांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …