कर्जत : बातमीदार
युनायटेड स्पोर्ट्स अॅण्ड अॅडव्हेंचरकडून 9 ऑक्टोबर रोजी नेरळ परिसरात निसर्ग मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी तीन आणि पाच किमी अंतराची आणि वरिष्ठ गटासाठी 25, 37.5 आणि 50 किमी अंतराची ही स्पर्धा आहे. सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्रातून या स्पर्धेचा शुभारंभ होईल.
निसर्ग मॅरेथॉनमध्ये लहान डोंगर, शेती, नाले आणि लाल मातीच्या तसेच कच्चा रस्त्यावरून दिलेल्या मार्गाने मॅरेथॉनपटू आपले इच्छित स्थळ गाठतात. या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवरील 400हून अधिक धावपटू सहभागी होणार आहेत.
या मॅरेथॉनमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे. सहभाग नोंदविण्यासाठी युनायटेड स्पोर्ट्स अॅण्ड अॅडव्हेंचरचे विकास मोरे (7977875816) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …