Breaking News

गव्हाण, मोर्बे, नेरे येथे प्राथमिक तपासणी शिबिरास प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने 16 ऑक्टोबर रोजी खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. या महाशिबिराच्या अनुषंगाने तालुक्यातील मोर्बे, गव्हाण आणि नेरे येथे रविवारी (दि. 2) प्राथमिक तपासणी शिबिर झाले. या उपक्रमास भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट दिली.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा पंधरवड्यानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत होणार्‍या महाशिबिराच्या अनुषंगाने मोर्बे येथील डांगर्णेश्वर मंदिर सभागृहात, गव्हाण ग्रामपंचायत हॉल आणि नेरे येथील समित्र गणेश उत्सव मंडळाच्या सभागृहात प्राथमिक तपासणी शिबिर झाले. या विविध शिबिरांना भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, माजी जि. प. सदस्य अमित जाधव, माजी पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, ओबीसी सेल अध्यक्ष एकनाथ देशेकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, वाकडीचे माजी सरपंच नामदेव जमदाडे, नरेश पाटील, वावंजेचे माजी सरपंच प्रकाश खैर, नितळसचे माजी सरपंच कैलास मढवी, आंबेचे माजी सरपंच तुकाराम पाटील, संतोष आगलावे, दीपक बोडे, रामदास म्हात्रे, जनार्दन भगत, रमेश नावडेकर, बाळाराम उसाटकर, एकनाथ नाईक, दिनेश फडके, पिंटू म्हात्रे, लक्ष्मण पाटील, तुकाराम पाटील, अंकेश पाटील, रवी पाटील, चांगो चौधरी, चिंध्रणच्या सरपंच कमला देशेकर, महाळुंगी ग्रामपंचायतीच्या सदस्य निलम अरिवले, नितळसचे उपसरपंच भार्गव मढवी, नेरे ग्रामपंचायतीच्या सरपंच राजश्री म्हसकर, माजी सरपंच वासुदेव गवते, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गडगे, एकनाथ पाटील, वर्षा पाटील, युवा मोर्चा नेरा जि. प. विभागीय अध्यक्ष सागर पाटील, चिंचवली माजी सरपंच रमेश पाटील, कोप्रोली माजी सरपंच रमेश पाटील, डॉ. रोशन पाटील, राम पाटील, तेजस जाधव, जगदिश म्हसकर, माजी सरपंच जयंत मानकामे, हेमंत मानकामे, मिलिंद पाटील, अमित गवते, किशोर खारके, संतोष चोरगे, शैलेश जाधव आदी उपस्थित होते.
आरोग्य महाशिबिरात सर्वसाधारण रोग, महिलांचे आजार, हृदयरोग, हाडांचे रोग, मधुमेह, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, हिमोग्लोबिन, बालरोग, त्वचा व गुप्तरोग तपासणी, दंतरोग तपासणी, नाक-कान-घसा, सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, कॅन्सर तपासणी, क्षयरोग तपासणी आणि औषधोपचार मोफत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आयुष्यमान भारत डिजिटल कार्डसुद्धा या शिबिरात तयार करून देण्यात येणार आहेत. या महाशिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव परेश ठाकूर यांनी केले आहे.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply