Breaking News

सेवा पंधरवड्यानिमित्त पनवेलमध्ये नमो प्रदर्शनी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी कृतित्व, व्यक्तित्व व जनकल्याणकारी योजनांवर आधारित एकदिवसीय नमो प्रदर्शनी पनवेलमध्ये रविवारी (दि. 2) आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमास नागरिकांचा प्रतिसाद लाभला.
पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित या नमो प्रदर्शनीचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभास महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेवक अनिल भगत, एकनाथ गायकवाड, बबन मुकादम, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. पाटील, भाजपचे शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड जिल्हा संयोजक अभिषेक पटवर्धन, सहसंयोजक गणेश जगताप, संजीव कुलकर्णी, अमोल खेर, शहर संयोजक निखिल गोरे, वैभव बुवा, साई निकाळजे, रोहित पाटील, कौस्तुभ सोमण यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नमो प्रदर्शनीची पाहणी करीत उत्तम आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
देशाला जगात ताकदवान बनविण्याचे काम करणारे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी वचनबद्ध आहे. ते अंत्योदयाचा संकल्प देत देशातील गोरगरीब, शोषित व वंचित वर्गाच्या कल्याणाकरिता देशसेवेचे ध्येय साध्य करीत विविध जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी समर्पित भावनेने कार्यरत असतात. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात भारतीय जनता पक्षाच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत सेवात्मक, रचनात्मक, व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व अशा विविध सेवाकार्य असलेल्या सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने नमो प्रदर्शनी भरविण्यात आले. या प्रदर्शनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर तसेच योजनांवर आधारित चित्र स्वरूपात माहिती उपलब्ध करून देण्यात आली होती. पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी याचा लाभ घेत आयोजकांना धन्यवाद दिले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply