मुंबई : रामप्रहर वृत्त
राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी शनिवारी (दि. 18) जाहीर करण्यात आली. गडचिरोलीचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आले आहे. बीड आणि पुण्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे, तर मुंबई शहर आणि ठाण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे देण्यात आली आहे. नागपूर व अमरावती चंद्रशेखर बावनकुळे, अहिल्यानगर राधाकृष्ण विखे-पाटील, वाशिम हसन मुश्रीफ, सांगली चंद्रकांत पाटील, नाशिक गिरीश महाजन, पालघर गणेश नाईक, जळगाव गुलाबराव पाटील, यवतमाळ संजय राठोड, मुंबई उपनगर आशिष शेलार व मंगलप्रभात लोढा (सहपालकमंत्री), रत्नागिरी उदय सामंत, धुळे जयकुमार रावल, जालना पंकजा मुंडे, नांदेड अतुल सावे, चंद्रपूर अशोक उईके, सातारा शंभुराज देसाई, रायगड आदिती तटकरे, लातूर शिवेंद्रसिंह भोसले, नंदुरबार माणिकराव कोकाटे, सोलापूर जयकुमार गोरे, हिंगोली नरहरी झिरवाळ, भंडारा संजय सावकारे, छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट, धाराशिव प्रताप सरनाईक, बुलडाणा मकरंद जाधव-पाटील, सिंधुदुर्ग नितेश राणे, अकोला आकाश फुंडकर, गोंदिया बाबासाहेब पाटील, कोल्हापूर प्रकाश आबिटकर व माधुरी मिसाळ (सहपालकमंत्री), गडचिरोली आशिष जैस्वाल (सहपालकमंत्री), वर्धा पंकज भोयर आणि परभणीचे पालकमंत्रीपद मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याकडे देण्यात आले आहे.
Check Also
अमृत महोत्सवानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभीष्टचिंतन
पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मल्हार नेटवर्क प्रा. …
RamPrahar – The Panvel Daily Paper