Breaking News

खालापुरातील शिवसेना उबाठा पदाधिकारी भाजपमध्ये

मुंबई : रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघामधील आणि खालापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशकर्त्यांचे भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पक्षात स्वागत केले.
मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजप हा आधी राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या विचारधारेतून देशसेवेसाठी आपले जीवन समर्पित करणार्‍या देशभक्त कार्यकर्त्यांचा एकमेव पक्ष आहे. त्यामुळेच सामाजिक कार्याची तळमळ असणारे अनेक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने भाजप परिवारात प्रवेश करत आहेत. त्यानुसार खालापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोतीराम ठोंबरे, वावर्ले ग्रामपंचायतीतील माजी सरपंच राजू मोरे यांच्यासह वावर्ले, धारणी, जांभिवली, आसरे, मोरबे, भिलवले, चौक, हातनोली, वरोसे, आसरोटी, कोपरी, कलोते या गावांतील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत करण्यात आले.

Check Also

भिंगारी संघाने जिंकला नमो क्रिकेट चषक

पनवेल : रामप्रहर वृत्तनमो चषक 2025 अंतर्गत खारघर येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भिंगारी …

Leave a Reply