Breaking News

‘आम्ही घाबरल्याने सामना गमावला’

मोहाली : वृत्तसंस्था

पंजाबच्या 167 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघ 17 षटकांत 3 बाद 144 असा सुस्थितीत होता; पण या आयपीएल लढतीत पंजाबच्या सॅम करनने हॅटट्रिक नोंदवली अन् दिल्लीचा डाव 19.2 षटकांत 152 धावांत आटोपला. नेमके काय झाले? संघाचा डोलारा असा कोसळला कसा? या प्रश्नांना उत्तर देताना दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरची प्रतिक्रिया होती, ‘मी निःशब्द झालो आहे. आम्ही घाबरलो, त्या भरात डावपेच चुकले आणि गडबडलो. असे हाताशी आलेले सामने गमावणे, संघाचे नुकसान करणारे आहे…’

श्रेयसची प्रतिक्रिया एवढ्यावरच थांबत नाही तो म्हणतो, ‘खूपच निराश झालो आहे! ज्या पद्धतीने आम्ही लक्ष्याचा पाठलाग करत होतो, सारे उत्तम सुरू होते. चेंडूला धाव अशी गती होती. त्या स्थितीतून लढत गमावण्याची आफत आली. पंजाबने सर्वच स्तरावर उत्तम खेळ केला, तर आम्ही हुशारीत कमी पडलो. आव्हानाचा पाठलाग करताना चूक झाली, मधेच विकेट पडल्याने आमचा गोंधळ उडाला. ख्रिस मॉरिस आणि ऋषभ पंत परतल्यानंतर इतर फलंदाजांनी पुढाकारच घेतला नाही.’

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply