उलवे नोड : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालय मराठी माध्यमाचे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी
(दि. 17) रंगले. या वेळी संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, कामगार नेते महेंद्र घरत, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटी सदस्य अनंताशेठ ठाकूर, माजी पं.स. सदस्य रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, श्रीकांत घरत, रघुनाथ देशमुख, कमलाकर देशमुख, सुधीर ठाकूर, अमर म्हात्रे, निलेश खारकर, कविता खारकर, राजेश खारकर, शैलेश भगत, दिलीप कोळी, रामनाथ कोळी, अंकिता खारकर, कांबळे गुरुजी, धीरज ओवळेकर, प्रतिभा भोईर, धनराज मुंगाजी, मुख्याध्यापिका व ‘रयत’च्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य जोत्स्ना ठाकूर आदी उपस्थित होते.
Check Also
भिंगारी संघाने जिंकला नमो क्रिकेट चषक
पनवेल : रामप्रहर वृत्तनमो चषक 2025 अंतर्गत खारघर येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भिंगारी …