Breaking News

खालापुरातील फिनोझोल कंपनीला आग

खालापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील ढेकू औद्योगिक वसाहतीमधील फिनोझोल कंपनीला बुधवारी (दि. 2) सकाळी अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविले. अन्यथा संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असती. फिनोझोल कंपनीत रसायनासाठी परवानगी आहे. प्रत्यक्षात मात्र स्फोटक मालाचे उत्पादन करतात तसेच अगदी थोड्या जागेत उत्पादन घेतात, मात्र औद्योगिक सुरक्षा दल जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार सुदाम पाटील या ग्रामस्थांने केली. काही दिवसांपूर्वी ढेकू परिसरातील युनिव्हर्सल  कंपनीला आग लागली होती. त्याच कंपनीच्या शेजारच्या फिनोझोल कंपनीत बुधवारी आगीची घटना घडली. या आगीचे कारण समजू शकले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. या घटनेत जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

Check Also

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना होणार फायदा मुंबई : रामप्रहर …

Leave a Reply