Breaking News

खोपोली येथील विविध समाज घटकांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

खोपोली : प्रतिनिधी
भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खोपोली येथील विविध समाजघटकांतील सुमारे २०० कार्यकर्त्यांनी ‌‘कमळ‌’ हाती घेतले. त्यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले.
भाजप खोपोली शहर आणि विक्रम साबळे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य दहीहंडी उत्सवाचे औचित्य साधून महाराजा मंगल कार्यालयाच्या प्रांगणात हा भव्य पक्षप्रवेश झाला. या कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, युवा नेते नगरसेवक परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी सुमारे २०० कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये ज्ञानेश्वर बनसोडे, अली शेख, मोहसिन शेख, रेहान शेख, सागर वाकुळे, तुफेल शेख, वेदांत मरागजे, राहुल गोचायत, गोरक्ष पवार, हर्ष पाटोळे, साहिल जांभळे, तुषार पाटोळे, मंथन शिंदे, प्रशांत सूर्यवंशी, कमरान शेख, केतन पाटोळे, नितील शर्मा, निलेश यादव, निरजालू राजपूत, मनीष कुमार, सलमान काझी, पल्लवी लोंढे, शाहीद शेख, सोनिया सुर्वे, मोईन शेख, आरती मिश्रा, सोनिया कांबळे, आदित्य पवार, अलका झा, सुफियान शेख, राज पवार, अरसलान शेख, फैज शेख, दस्तगीर शेख, हमजा शेख, शाहीद बागवान, अरमान शेख, दिलशाद शेख, अक्लू शेख, जुबेर शेख, सूर्यकुमार यादव, अंगद प्रसाद, चंदू भारद्वाज, शंभू उपाध्याय, तथी उपाध्याय, सौरभ चौधरी, भरत सिंह, दीपक पाठक, सर्वोदय तिवारी, सरोज झा, बबिता सौ, ऋषिकेश तिवारी, चंद्रशेखर सिंह, मंपूसिंह, अर्चना सिंह, श्रीकांत यादव, रचना सिंह, तेजप्रकाश रामो, संतोष शर्मा, सतीश सिर, प्रमोद मिश्रा, अनिल झा, प्रेम दुढाळे, आदित्य झेंडे, संस्कार यादव, सुमित सकाटे, परशुराम बनसोडे, आवैज शेख, सागर आरकेरी, हैदर शेख, सागर कांबळे, अहमद शहा, अप्पा बनसोडे, स्वप्नील शेडगे, तुषार पवार, आर्यन फाळे, राजकुमार ढाबी, प्रिन्स धडवाल, राजकुमार बनसोडे, रेहान शेख, लक्ष्मण कांबळे, मानस पोतदार, रितेश भालेराव, ओंकार गवाडे, ओम कुशवाहा, उत्तम साबळे, आदिल सय्यद, निखिल सांदल, शुभम मासोलकर, हुसेन पटेल, अफरोज मोमीन, शंकर कांबळे, लक्ष्मण मसाळीकेरे, अमन शेख, बाबू कांबळे, हबीब शेख, सोनू बिंगार्डिवे, तनवीर शेख, नंदू यादव, सार्थक पक्के, अक्षय आरकेरी, इरफान शेख, शोएब सय्यद, संजय सोलंकी यांच्यासह अनेकांचा समावेश होता.
याचबरोबर राजेश कुमार उपाध्याय, निधी उपाध्याय, सीमा उपाध्याय, अर्पित उपाध्याय, रणोवर उपाध्याय, राजावर उपाध्याय, पं. संजीत झा, अलका झा, केशर उपाध्याय, अरुण झिंड, मिनू सिंह आणि संजीव कुमार मिश्रा यांच्यासह अनेक मान्यवरांनी भाजपमध्ये प्रवेश करून पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीला बळ दिले. या सर्वांचे मान्यवरांनी भाजप परिवारात स्वागत केले.
कार्यक्रमास भाजप अल्पसंख्याक नेते हाजी अराफत शेख, भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, ओबीसी जिल्हाध्यक्ष राजेश भगत, विठ्ठल मोरे, आरिफ शेख, ज्येष्ठ नेते यशवंत साबळे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, खोपोली शहराध्यक्ष अजय इंगुलकर, सभापती किशोर पाटील, नगरसेविका सानिया शेख, प्रतीक्षा रेटरेकर, अश्विनी अत्रे, माजी नगरसेवक अविनाश तायडे, जिल्हा पदाधिकारी संजय तन्ना, शहर सरचिटणीस विकास खुरपुडे, विनायक माडपे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

हॉटेल सी रॉकचे चित्रपटसृष्टीशी नातेसंबंध…

चित्रपटाच्या जगात एवढे, असे आणि इतके रंग एकमेकांत मिसळले गेले आहेत की त्याचा शोध अजिबात …

Leave a Reply