संत रोहिदास महाराजांच्या कार्याला मान्यवरांकडून उजाळा
पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाच्या वतीने संत रोहिदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून समरसता संकल्प अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानांतर्गत पनवेल शहर मंडळातर्फे शहरातील रोहिदास वाडा येथील समाजमंदिरामध्ये विशेष कार्यक्रम झाला. भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून प्रसिद्ध कवी, गझलकार व समीक्षक रोहिदास पोटे यांनी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, प्रभाग समिती सभापती अजय बहिरा, माजी सभागृहनेते तथा नगरसेवक परेश ठाकूर, नगरसेवक मनोज भुजबळ, सुमित झुंजारराव, नगरसेविका दर्शना भोईर, विलास मोहोकर, सारिका भगत, शिवदास कांबळे, सुलोचना कल्याणकर, सुरेखा मोहकर, रेणुका मोहोकर तसेच शहर सरचिटणीस अमित ओझे, रूपेश नावेकर, सपना पाटील, विजय मोहोकर, गणेश कडू, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, लक्ष्मण कल्याणकर, जगदीश उरणकर, प्रवीण मोहोकर, महेश राऊळ, चंद्रकांत मंजुळे, आतिश मोहोकर, समीप मोहोकर, समित म्हात्रे, विकास उरणकर, सचिन उरणकर, मिलिंद उरणकर, दिनेश भोस्कर यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी निबंध आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
RamPrahar – The Panvel Daily Paper