कर्जत : बातमीदार
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त दहिवली कर्जत येथील छत्रपती संभाजी राजे चौक येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कथन केला.
कर्जत-मुरबाड महामार्ग येथे दहिवली नाक्यावर असलेल्या नामफलकाला वसंत कोळंबे, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, मराठा स्वराज्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अनिल भोसले यांनी पुष्पहार घातला. त्यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकांत आगिवले, माजी सरपंच दिलीप माळी, अशोक मोरे, विजय कोंडीलकर, विशाल माळी, तीर्थेश शिंदे, महेंद्र भोईर, संतोष भासे, संतोष ऐनकर, रवी शेलार, खानविलकर, भूषण धुळे, आकाश खुराडे, अनिरुद्ध पंडित, मच्छिंद्र बार्शी आदी उपस्थित होते. संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष सज्जन गवळी यांनी प्रास्ताविक केले. माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी संभाजी महाराज चौकाचे सुशोभीकरणाची घोषणा केली. अनिल भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले.