शितोळे येथे प्रांताधिकार्यांच्या हस्ते बांधकामाचे भूमिपूजन
पेण ः प्रतिनिधी
पेण हे जिल्ह्यातील मतदारसंघांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथील शितोळे आदिवासीवाडीजवळील जागेची निवड ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन्सच्या साठवणुकीसाठी केली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे यांनी दिली. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन्सच्या साठवणुकीसाठी आवश्यक असलेल्या गोदामाच्या बांधकामाचे भूमिपूजन शितोळे येथे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना शितल उबाळे यांनी सांगितले की, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन्सच्या साठवणुकीसाठी आवश्यक असलेल्या गोदामाच्या बांधकामास साधारणत: एक वर्षाचा कालावधी लागेल. शासनाकडून या कामासाठी आठ कोटी 71 लाख 24 हजार मान्यता मिळाली आहे. या कार्यक्रमास प्रांताधिकारी पेण प्रांत विठ्ठल इमानदार, रोहा प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवळ, बांधकाम अभियंता जगदीश सुखदेवे, पेण तहसिलदार श्रीमती स्वप्नाली डोईफोडे,उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, दादर सागरी पोलीस निरीक्षक गोविंदराव पाटील, उद्योजक राजू पिचिका आदी उपस्थित होते.