Breaking News

आमदार महेंद्र दळवींनी हाकली जीवा-शिवाची बैलजोड

अलिबाग : प्रतिनिधी

गाडीवालं दादा… गाडीवालं दादा होऽऽऽऽऽ! अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार महेंद्र दळवी यांनी सोमवारी (दि. 28) गाडीवालं दादाची भूमिका साकारताना चक्क बैलगाडी हाकलण्याचा

आनंदही लुटला.

रंगीत टी-शर्ट… एका हातात कासरा, एका हातात काठी घेऊन आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग तालुक्यातील नवगाव-वायशेत मार्गावर बैलगाडी पळवली. त्यांचे हे गाडीवाल्या दादाचे रूप अनेकांनी आपल्या मोबाइल कॅमेर्‍यात कैद केले.

बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा या दिवशी शेतकरी आपले बैल सजवून फेरफटका मारण्यासाठी बाहेर काढतात. चार महिने शेतीच्या कामात व्यस्त असणारे शेतकरी त्यानिमित्ताने एक वेगळा आनंद लुटतात. आमदार महेंद्र दळवी यांनीही त्यांच्या आनंदात सहभागी होऊन मीही तुमच्यातलाच आहे हे दाखवून दिले.

Check Also

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …

Leave a Reply