पनवेल : वार्ताहर
एका लॉरीचालकाने रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून गाडीचे मागील चाक मोटरसायकल स्वारावर चढवल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील दोघे जण जखमी झाले असून मोटरसायकलीचेदेखील नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रोडपाली येथे राहणार गोविंदा जैयस्वाल (वय 19) हा त्याचा मित्र साजनकुमार यांच्यासोबत स्कुटर सुझुकी एक्सेस (एमएच 03 डीएन 2629) वरून मुंबा पनवेल वाहिनी, तळोजा रेल्वे स्टेशनसमोर जात होते. या वेळी अज्ञात लॉरीचालकाने (एमएच 05 ईएल 3910) रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून गोविंदा यांच्या स्कूटीला कट मारल्याने लॉरीचे डावे बाजुचे मागील चाक त्यांच्या अंगावर चढले यामध्ये गोविंदा आणि त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले. अपघातामध्ये मोटरसायकलीचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Check Also
कामोठे येथे समाजोपयोगी वस्तूंच्या वाटपाचा उपक्रम
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कौतुक कामोठे ः रामप्रहर वृत्तनेत्याची खरी ताकद ही त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये असते. …
RamPrahar – The Panvel Daily Paper