Breaking News

पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी

उरण : प्रतिनिधी

नवीन शेवा गावाजवळ सिडकोच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे पावसाळ्याच्या आधी उद्घाटन करावे अन्यथा तो खुला करण्यात येईल, असा इशारा आई फाऊंडेशनने दिला आहे.

उरण परिसरात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे उड्डाणपुलांचे जाळे निर्माण होत आहे. त्यातील काही पुलांचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, तर काही पूर्ण होऊनही सिडको उद्घाटन करण्याच्या तयारीत नसल्याचे समजते. यामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.नवीन शेवा व बोकडविरा गावाच्या मधून उड्डाणपुलाचे काम सुरू होते. सदर पुलाचे काम पूर्ण होऊन तो उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. सिडको विभाग या ठिकाणी एखादा अपघात झाल्यानंतर उद्घाटन करेल का, असा सवाल उपस्थित होत आहे. तरी सिडकोने हा पूल पावसाळ्यापूर्वी खुला करावा अन्यथा तो आम्ही खुला करू, असा इशारा आई फाउंडेशनने दिला आहे.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply