Breaking News

खांदा कॉलनीतील हरिनाम सप्ताहाला मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट

पनवेल ः रामप्रहर वृत्त
श्री संत वामनभाऊ व भगवानबाबा पुण्यतिथीनिमित्त खांदा कॉलनीत अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाला बुधवारी (दि. 11) राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भेट दिली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होेते. पोलीस ठाण्यासमोरील मैदानात हरिनाम सप्ताहात 7 ते 14 जानेवारीदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत.

मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भेटीवेळी भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, सरचिटणीस विक्रांत पाटील, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर, उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, माजी उपमहापौर सीताताई पाटील, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, भाजप नेते भीमराव पोवार, माजी पं.स. सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, खांदा कॉलनी अध्यक्ष अभिषेक भोपी, खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष कोकाटे, मंडळाचे अध्यक्ष हरिदास वणवे, उपाध्यक्ष सुनील खाडे, विनायक मुंडे, सचिव देविदास खेडकर, खजिनदार संजय वायभासे, उपसचिव दिलीप नाकाडे, दत्त बिनवडे, उपखजिनदार शिवाजी लांब, बाळासाहेब बडे, विष्णू वायभासे, किसन लांडगे, सल्लागार सदानंद पाटील, कचरू डमाळे, रामदास नाकाडे, सतीश गरजे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकही उपस्थित होते. आयोजकांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत व सन्मान करण्यात आला.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply