Breaking News

उत्तरप्रदेशात खून करून फरार झालेल्या चौघांना खारघरमध्ये बेड्या

पनवेल : वार्ताहर
उत्तरप्रदेश राज्यातील देल्हूपूर पोलीस ठाणे हद्दीत एका व्यक्तीचा खून करून चार आरोपी फरार झाले होते. त्या आरोपींना गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने खारघर येथून शिताफीने अटक करून त्यांना गुन्हयाच्या पुढील तपासकामी देल्हूपूर पोलिसांच्या पथकाच्या ताब्यात दिले आहे. उत्तरप्रदेश राज्यातील जिल्हा प्रतापगढ मधील देल्हूपूर पोलीस ठाणे हद्दीत वकिल अहमद उर्फ पप्पु (वय 45 वर्षे, रा. तौकलपुर, ता. राणीगंज, देल्हूपुर, जि. प्रतापगढ) यांचा आरोपींसोबत पुर्वी पासून वाद होता. त्यादरम्यान अहमद यांचा भाऊ रकिब व भाचा असफाक मोटरसायकल वरून देल्हूपुर बाजारातून घरी जात असताना आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून हातात लाठ्याकाठ्या, लोखंडी सळई घेवून रिकीब व असफाक यांना जिवे ठार मारण्याचे उददेशाने त्यांचे ताब्यातील ब्रिजा कारने रकिब व असफाक यांच्या मोटर सायकलला ठोकर मारून त्यांना खाली पाडुन हातातील लाठ्याकाठ्या व लोखंडी सळईने त्यांना मारहाण केली. तसेच आरोपींनी त्यांचे हातातील अग्निशस्त्राने जखमींवर फायर करून त्यांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती केल्या व शिविगाळी करून जिवे ठार मारण्याची धमकी देवून तेथून पळुन गेले. या गुन्हयातील जखमी रकिब हा दवा उपचारा दरम्यान मयत झाला. खुना सारख्या गंभीर गुन्हयातील आरोपी हे गुन्हा घडल्यानंतर फरार झाल्याने व त्यातील चार आरोपी हे नवी मुंबई परीसरात वास्तव्यास असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदर आरोपींचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वेगवगेळे पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. गुन्हे शाखा कक्ष 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काही दिवसांपासून वर नमुद गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असताना गुन्हयातील 4 आरोपी हे खारघर असल्याबाबत गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीलायक प्राप्त केली. तसेच गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून मिळालेल्या माहिती प्रमाणे सेक्टर 8, खारघर येथे जावून सापळा लावून सदरचे आरोपी हे पळुन जाण्याचे तयारीत असताना त्यांना शिताफिने ताब्यात घेण्यात आले. इम्रान असीर खान(वय 30 वर्षे), मोहम्मद सलमान असीर खान(वय 29 ), गुफारान असीर खान (वय 20) मोहम्मद मुजीद इब्रार अली(वय 22) अशी या आरोपींची नावे आहेत. त्यांना पुढील तपासकामी देल्हूपुर पोलीस ठाणे, उत्तरप्रदेश येथील पोलीस उप निरीक्षक राकेश चौरसीया व त्यांच्या पोलीस पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
ही कारवाई नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील, सहाय्यक निरीक्षक प्रविण फडतरे, संदिप गायकवाड, उपनिरीक्षक मानसिंग पाटील, वैभवकुमार रोंगे, हवालदार ज्ञानेश्वर वाघ, मधुकर गडगे, सचिन पवार, अनिल पाटील, प्रशांत काटकर, रमेश शिंदे, रणजित पाटील, अजित पाटील, तांडेल, निलेश पाटील, रूपेश पाटील, इंद्रजित कानु, दिपक डोंगरे, सागर रसाळ, राहुल पवार, नाईक आजिनाथ फुंदे, प्रफुल्ल मोरे, शिपाई संजय पाटील, प्रविण भोपी, विक्रांत माळ, अभय मेर्‍या, नंदकुमार ढगे यांनी केली आहे.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply