पनवेल : वार्ताहर
ठाणे येथून कळंबोली येथील रेल्वे यार्डमध्ये जाणार्या 12 चाकी बल्कर ट्रकच्या पाठीमागील चाकामध्ये आल्याने एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मुंब्रा-पनवेल मार्गावर फुडलँड कंपनीजवळ घडली. कळंबोली पोलिसांनी या अपघातातील ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करून राजपत्रात त्याला ताब्यात घेतले आहे. नालासोपारा येथे राहणारा ट्रकचालक राजेश यादव हा रविवारी सायंकाळी ठाणे येथून 12 चाकी टाटा बल्कर ट्रक घेऊन कळंबोली येथील फुडलँड कंपनीलगतच्या रेल्वे यार्डमध्ये जात होता. या वेळी यादव हा मुंब्रा-पनवेल मार्गावर फुडलँड कंपनीजवळून रेल्वे यार्डकडे जाण्यासाठी तेथील सिग्नलवर वळण घेत होता. याचवेळी रस्त्याच्या बाजूने चालत जाणारी 65 वर्षीय अज्ञात व्यक्ती ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली आली. या अपघातात व्यक्तीच्या दोन्ही पायांना जबर दुखापत झाल्याने कळंबोली पोलिसांनी त्याला तत्काळ एमजीएम रुग्णालयामध्ये दाखल केले. तिथे उपचार सुरू असताना, त्याचा मृत्यू झाला. या अपघातातील 12 चाकी बल्कर ट्रकचालकाने काळजी न घेता, निष्काळजीपणे ट्रक चालवून नेल्याने रस्त्याने पायी चालत जाणारी अज्ञात व्यक्ती ट्रकच्या चाकाखाली आल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तळोजा पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
Check Also
बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट
चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …
RamPrahar – The Panvel Daily Paper