Breaking News

कर्जत रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करावेत

कर्जत – प्रतिनिधी

कर्जत या मध्य रेल्वे वरील महत्वाच्या उपनगरीय रेल्वे स्थानक असल्याने मागील काही वर्षात कर्जत मध्ये झपाट्याने नागरीकरण होत आहे. वाढलेल्या नागरिकरणा बरोबर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या  लोकांचा वावर देखील वाढत चालला आहे. त्यामुळे कर्जत रेल्वे स्थानकाबाहेर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे  अनेक महिने बंद आहेत. त्यांची सुधारणा करण्याची मागणी छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण केंद्राकडून करण्यात आली आहे. कर्जत गाव  होते ते शहर झाले आहे.  आता पूर्वी सारखे ते राहिले नाही. वाढत्या नागरीकरणामुळे येथील लोकसंख्या तसेच इमारतीत भरमसाठ वाढ झाली आहे. रेल्वे गाड्यांमध्ये देखील वाढ झाल्याने बाहेरच्या नागरिकांची आवक जावक वाढली आहे म्हणूनच येथील गुन्हेगारी वाढली आहे. चोरीच्या प्रकरणात वाढ झाली आहे. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवणारी पोलीस यंत्रणा देखील तेवढीच सशस्त्र होणे गरजेचे असताना कर्जत रेल्वे स्थानकाच्या बाहेरच गुन्हेगारांच्या हालचालींची माहिती मिळावी म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र ते कॅमेरे हे अनेक महिने बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर अंकुश ठेवण्यात सुरक्षा यंत्रणेला त्रास होत आहे. त्यामुळे कर्जत रेल्वे स्थानकाच्या बाहेर असणार्‍या मुख्य तीन रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे खूप दिवसांपासून बंद असून ते त्वरित सुरू करण्याची मागणी छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटनेने केली आहे. कर्जत स्टेशन बाहेर असलेल्या पूर्वीच्या जकात नाका असलेल्या कर्जत रेल्वे स्थानकाच्या बाहेर रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्त नसल्याने ती कामे सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ण करत असतात. गेल्या एक महिन्यांपूर्वी कर्जत शहरात चोरांनी धुमाकूळ घातला असताना काही सीसीटीव्ही मध्ये हे चोर थेट रेल्वे स्थानकातून येऊन भिसेगाव जुने एस टी स्टँडकडे – जाताना दिसत होते. तरीदेखील अजुन पर्यंत मुख्य भागातील सीसीटीव्ही बंद का ठेवले आहेत असा प्रश्न समोर येत आहे. शहराची सुरक्षा लक्षात घेऊन कर्जत पोलीस ठाणे यांनी मुख्य भाग असलेल्या कर्जत रेल्वे स्थानकाच्या बाहेरील खूप महिने बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित लावावेत व नागरिकांची सुरक्षा जोपासावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटनेने केली आहे.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply