Breaking News

भालीवडी ग्रामपंचायतमध्ये पुन्हा ग्रामसेवक वाद

बदलीच्या मागणीसाठी ठोकले होते टाळे

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील भालिवडी ग्रामपंचायतीमधील सरपंच आणि सदस्यांचा विरोध असतानाही ग्रामसेवक राजश्री कदम पुन्हा रुजू झाल्या आहेत.  प्रभारी ग्रामसेवक अरुण राजपूत यांना कायमस्वरूपी करण्याची सरपंचांची मागणी केली आहे. मात्र तेथे नवीन ग्राम विकास अधिकारी प्रभारी म्हणून पाठवले असताना पुन्हा त्याच ग्रामसेविका पुन्हा हजर झाल्याने भालीवडी ग्रामपंचायतीमध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी भालिवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच आणि सदस्यांनी मिळून ग्रामपंचायतीला टाळे ठोकले होते. भालिवडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका राजश्री कदम यांच्याविरोधात सरपंच आणि सदस्य आक्रमक झाले होते. ग्रामविकास अधिकार्‍यांना बदलण्याच्या मागणीसाठी पदाधिकर्‍यांनीही थेट ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले होते. या गोष्टीची दखल घेत कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांनी भालीवडी ग्रामपंचायतमध्ये  ग्रामविकास अधिकारी अरुण राजपूत यांना प्रभारी ग्रामसेवक म्हणून पाठवले होते. त्यामुळे तेथील बंद असलेले ग्रामपंचायत कार्यालय सुरू करण्यात आले होते. प्रभारी ग्राम विकास अधिकारी अरुण राजपूत यांची भालीवडी ग्रामपंचायतीत प्रभारी ग्रामसेवक म्हणून सुरळीत काम करत असताना कोणतीही पूर्व सूचना न देता 1 मार्च रोजी राजश्री कदम या पुन्हा ग्रामपंचायतीत रुजू झाल्या. त्यामुळे भलीवडी ग्रामपंचायतीमधील सरपंच आणि सदस्यांनी पुन्हा कर्जत पंचायत समितीमध्ये जाऊन गटविकास अधिकार्‍यांकडे निवेदन दिले आहे. आता प्रभारी ग्रामसेवक असलेले अरुण राजपूत यांना कायमस्वरूपी कार्यरत करण्यासाठी भालीवडी ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक कार्ले यांनी गटविकास अधिकार्‍यांना पत्र दिलं आहे. सरपंच दीपक कार्ले, उपसरपंच आणि सदस्यांनी अनेक वेळा ग्रामसेवक बदलण्याची मागणी केली होती. मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर सर्वांनी मिळून ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले होते. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या बाबीची दखल घेत भालीवडी ग्रामपंचायतीसाठी  राजपूत यांची प्रभारी ग्रामसेवक म्हणून नियुक्ती केली आहे. गटविकास अधिकार्‍यांचे पत्र मिळताच राजपूत यांनी आपला कार्यभार स्वीकारला होता. कर्जत पंचायत समितीने प्रभारी म्हणून पाठवलेले ग्रामविकास अधिकारी असलेले राजपूत यांना कायमस्वरूपी करावे जेणेकरून ग्रामपंचायतीतील कामे सुरळीत पार पडतील अशी मागणी सरपंच दिपक कार्ले यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकार्‍यांकडे केली आहे. ग्रामसेवक राजश्री कदम यांना सरपंच सदस्य तसेच ग्रामस्थांनी अनेक वेळा विरोध केला आहे.

ग्रामसेवकांना बडतर्फ करावे

ग्रामसेवक राजश्री कदम या स्वतःच्या अंगावर इजा करतात आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अनुपस्थित असतात तसेच वैयक्तिक अडचणी असताना त्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात येऊन स्वतःला ईजा करून घेत आहेत. त्यामुळे अशा ग्रामसेवक आमच्या ग्रामपंचायतीत नको. असा पवित्रा घेत शासनाने कदम यांना बडतर्फ केले पाहिजे अशी मागणी देखील सरपंच दिपक कार्ले यांनी केली आहे.

 

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply