Breaking News

महिलेचा खून करून फिर्यादीस ठार मारण्याचा प्रयत्न करणारे दोघे गजाआड

उरण : प्रतिनिधी
महिलेचा खून करुन फिर्यादीस जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्‍या 2 आरोपींना 24 तासांच्या आत न्हावाशेवा पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. फिर्यादी सलोनी ओमन हेरेंज (38) धंदा गृहिणी, राह. रवींद्र घरत यांची चाळ, से.15, शेलघर, ता. पनवेल जि. रायगड, मुळ राह जलतांडा, धानामुंजी, जि. कुटी, राज्य झारखंड 8 व मयत महिला अनिता उर्फ आमेरदकानी सरावनन नाडर(36) वर्ष या दि. 1 एप्रिल रोजी रात्रौ 22:30 वा. फिर्यादीच्या घरी बसली असताना यातील मयत महिला व आरोपी क्र. 1 यांचेमध्ये पुर्वी झालेल्या भांडणावरून आपसात बाचाबाची चालु होती. त्यावेळी आरोपीत क्र. 1 यास मयत महिलेने तु इसका कौन लगता है, तुम क्यु यहाँ पे रहता है. असे बोलल्याने आरोपी क्र. 1 यास या गोष्टीचा राग येवुन त्याने फिर्यादी यांचे घरामध्ये दरवाजास अडवण्यासाठी ठेवण्यात आलेली सिमेंटची विट (फेवर ब्लॉक) उचलून त्याने मृत महिलेस मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी आरोपी क्र. 2 याने आरोपी क्र. 1 यास मदत करून मृत महिलेस इसको मार-मार’ असे बोलून त्यास सहकार्य केले. आरोपी क्र. 1 हा मृत महिलेस मारहाण करीत असताना फिर्यादी मध्यस्थी करीत असताना दोघीनांही जीवे ठार मारण्याच्या उद्देषाने आरोपी क्र. 1 याने सिमेंट विट (ब्लॉक) ने मारहाण करून अनिता हिस निघृणपणे जिवे ठार मारले व फिर्यादी यांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती केल्या. याप्रकरणी न्हावाशेवा पोलीस ठाणे येथे गुन्हयाची नोंद केली आहे. गुन्ह्यातील आरोपी यांचेबाबत कोणतीही उपयुक्त माहिती उपलब्ध नसताना तसेच आरोपी मोबाईल फोन वापरत नसल्याने त्यांना ताब्यात घेणे आव्हानात्मक होते, असे असताना आरोपी यांचेबाबत गोपनिय माहिती काढून प्रथम एका संशयीत आरोपीस ताब्यात घेतले. त्यानंतर दुसर्‍या आरोपीचा शोध घेवून तो त्याच्या मुळगावी झारखंड येथे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यास देखील ताब्यात घेतले.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply