Breaking News

सुरेश लाडांना महामंडळ दिल्यास शिवसेनेचा विरोध; आमदार महेंद्र थोरवे यांचा इशारा

खोपोली ः प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सुरेश लाड यांना राज्य शासनाने महामंडळ दिल्यास कर्जत-खालापूर तालुक्यातील शिवसेनेचा त्यास विरोध असेल, अशी भूमिका शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी एका स्थानिक वाहिनीशी बोलताना भूमिका स्पष्ट केलीय. त्यामुळे जिल्ह्यात आगामी काळात राष्ट्रवादी व शिवसेनेत पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. पक्षनेतृत्वावर नाराज होऊन मागील महिन्यात सुरेश लाड यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या रायगड दौर्‍यादरम्यान जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर माजी मंत्री आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी लाड यांची एकांतात बैठक घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. या बैठकीनंतर लाड यांना महामंडळ दिले जाणार, असा कार्यकर्त्यांचा सूर आहे. याबाबत पक्षश्रेष्ठीही अनुकूल असल्याचेही म्हटले जात होते. हे वृत्त सर्वत्र पसरल्यानंतर कर्जत, खालापूर तालुक्यांतील शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली असून शिवसेनेचे स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी, तर लाड यांना महामंडळ दिल्यास आपला तीव्र विरोध असेल, असे एका स्थानिक युट्युब चॅनेलशी बोलताना सांगून लाड यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पुन्हा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply