महाड : प्रतिनिधी
महाड शहराच्या हद्दीत स्वामी समर्थ मठात दर्शनासाठी आलेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी महाड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई संजय यशवंत जाधव याच्याविरोधात महाड पोलिसांनी अखेर दोन दिवसांनंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे, मात्र अद्याप त्याला अटक केली नाही. संजय जाधव हे महाडमधील राष्ट्रवादीचे नेते वाय. सी. जाधव यांचे पुत्र आहेत. पोलीस कर्मचार्यांनीच आरोपींना अभय देण्याची पोलिसांबद्दल महाड शहरात नाराजी व्यक्त केली जात आहे.
दोन दिवसांपूर्वी महाड शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या दादली गावातील स्वामी समर्थ मठात पीडित महिला दर्शनासाठी जात असताना पोलीस शिपाई संजय जाधव याने या महिलेला रस्त्यामध्ये थांबवून, ‘मला फोन कर, नाही तर तुझा फोन नंबर दे’ अशी धमकी दिली. याप्रकरणी महिलेने महाड पोलीस ठाणे गाठले, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली असल्याचे पीडित महिलेने सांगितले. अखेर शहरातील महिला व पत्रकारांचा दबाव वाढल्यानंतर पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या सूचनेनुसार आरोपी पोलीस शिपाई संजय जाधव याच्याविरोधात कलम 354,341,506, यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मात्र अजूनही मोकाट फिरत आहेत, असे पिडीत महिलेच्या पतीने सांगितले.
संजय जाधव राष्ट्रवादीचे नेते वाय. सी. जाधव यांचे पुत्र आहेत. दोन वर्षांपूर्वी महाआघाडीच्या वतीने भारत बंद करण्यात आला होता तेव्हा पोलीस शिपाई संजय जाधव याने महाड बाजारपेठेत व्यापार्यांना धमकावीत जबरदस्तीने दुकाने बंद करायला लावली होती. या प्रकरणी भाजपचे तालुका सरचिटणीस महेश शिंदे यांनी पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे जाधव यांची तक्रार केली होती, मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे प्रकरण दडपण्यात आले होते.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …