Breaking News

शिरवली-माणकुळे रस्त्याची दुरवस्था

अधिकार्‍यांना भाजप पदाधिकार्‍यांनी विचारला जाब

अलिबाग  : प्रतिनिधी

शिरवली-माणकुळे रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून खड्ड्यात गेला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या येथील भाजपच्या नेत्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. चव्हाण यांना याबाबत जाब विचारण्यासाठी घेराव घातला. त्यामुळे पावसाळ्यापुर्वी या रस्त्याची दुरूस्ती होईल, असे आश्वासन श्री.चव्हाण यांनी यावेळी दिले.

शिरवली-माणकुळे रस्त्यासंदर्भात 21 फेब्रुवारी 2019 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अलिबाग कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन बांधकाम खात्याने दिले होते. मात्र तीन महिने झाले तरी रस्ता दुरूस्त झाला नाही.

या रस्त्याच्या कडेला भराव करण्यात आला आहे. मात्र संरक्षण भिंतीचे काम धिम्या गतीने सुरू आहे. हे काम पावसाळ्यापुर्वी होणे अपेक्षित आहे. मात्र त्याकडे बांधकाम खात्याने गांभीर्याने लक्ष दिले नाही. हे काम पूर्ण न झाल्यास मोठी दुर्घटना होण्याची भिती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

बहिरीचा पाडा माणकुळे, नारंगीचा टेप, बंगला बंदर आदी गावांना जोडणारा हा मार्ग ठप्प होण्याची भितीही ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांनी संरक्षक भिंतीसह रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी भाजपचे पदाधिकारी अ‍ॅड. महेश मोहिते, परशुराम म्हात्रे, विकास काठे, सुजीत गावंड, मंगेश माळी आदींनी केली आहे. त्या अनुषंगाने शिरवली – माणकुळे रस्त्यासंदर्भात तातडीने उपयोजना करण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी मोरे यांंच्याशी चव्हाण यांनी संपर्क करून, यासंदर्भात लवकरच बैठक घेवून सदर प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे अश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी चव्हाण यांनी दिले.

Check Also

पनवेल, उरणमधील रेल्वे प्रवाशांच्या समस्या मार्गी लावणार

महाप्रबंधक धरमवीर मीना यांचे आश्वासन मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेल, उरणमधील रेल्वेशी संबंधित समस्या 31 …

Leave a Reply