पुणे ः प्रतिनिधी
सावकारी करणार्या अजय जयस्वाल यांची हत्या करणार्या दोघा मारेकर्यांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. विनायक उर्फ चिंटू कुमार कुर्तकोटी (28) आणि अविनाश दीपक जाधव (21) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत़.
पैशांच्या वादातून हा खून करण्यात आल्याचा संशय सुरुवातीला पोलिसांना होता़. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना हे आरोपी कोथरूडच्या चांदणी चौकात येणार असल्याची माहिती मिळाली होती़. पोलिसांनी तेथे सापळा रचून दोघांना पकडले़. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी खून केल्याची कबुली दिली आहे. भिशी चालवत व खासगी सावकारी करीत असलेल्या अजय जयस्वाल यांची आर्थिक वादातून व एका महिलेकडे वाकडी नजर असल्याच्या संशयावरून हत्या करण्यात आली होती.