अलिबाग तालुक्यातील सारळघोळ, सांबरकूंड, रेवस- करंजा हे तीन महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत. हे प्रकल्प पूर्ण व्हावेत असे आलिबाग तालुक्यातील जनतेला वाटते. कधीतरी बातमी आली की या प्रकल्पांबाबत चर्चा सुरू होते. काही दिवसांनी ती चर्चा थांबतें. लोक विसरून जातात. आता रेवस – करंजा पुलाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. या पुलाचा सविस्तर प्रकल्प अहवाल, अंदाजपत्रक व आराखडा तयार करण्यासाठी नव्याने सल्लागार नियुक्ती करण्यासाठी 5 कोटी रूपयाचीं तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी विचारलेल्या तारांकीत प्रश्नला उत्तर देताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यामुळे या पुलाच्या काम होईल असे लोकांना वाटू लागले आहे.
बॅ. ए. आर. अंतूले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी 1980 साली उरण आणि अलिबाग या दोन तालुक्यांना जोडण्यासाठी धरमतर खाडीवर रेवस -करंजा पूल बांधण्यासाठी मंजूरी दिली होती. त्याचे कामही सुरू झाले होते. दोन्ही बाजूंना जोड रस्ते बांधण्यात आले होते. परतु बॅ. अतुलेंचे मुख्यमंत्रीपद गेले आणि हा पूलही बारगळला. माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी रेवस-करंजा पुल व्हावा अशी मागणी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अर्थसंकल्पीय सभेत 3628 कोटी रूपयांच्या मुबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पास प्रशासकीय मंजूरी देताना त्यासाठी 650 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. रेवस-करंजा पूलासाठी देखील त्यात तरतूद करण्यात आली . 2013 साली आमदार प्रशांत ठाकूर व आमदार प्रकाश बिनसाळी यांनी यापुलाच्या कामासाठी एमएमआरडीएकडे पाठपूरावा केला अहोता. आमदार प्रशांत ठाकूर एमएमआरडीएचे सदस्य असताना त्यांनी एमएमआरडीएच्या सभेत या पुलाचा विषय उचलून धरला. त्यांच्या प्रयत्नांमुळे एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पाममध्ये रेवस-करंजा पुरलासाठी 407 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती. परंतु नंतर या पुलाबात हालचाली झाल्या नाहित.
अलिबाग हे आता मुंबईचे उपनगर बनत आहे. उरण ही भविष्यातील तीसरी मुबई आहे. यांना जोडणारा रेवस ज् करंजा हा महत्वाचा पूल आहे. सध्या आलबागहून उरणला जायचे असेल तर अलिबाग वडखळ – खारपाडा असा प्रवास करावा लागतो. यात पैसा व वेळेचा अपव्यय होतो. हे टाळण्यासाठी प्रवाशी रेवस-करंजा असा तरीतून प्रवास करतात. पुढे जायचे असल्यास दुसर्या वाहनाने प्रवास करावा लागतो. तरीतून मोटारसायकल नेता येते. परंतु मोठी वाहने नेता येत नाहित.त्यामुळे मोटारीने जायचे असल्यास खारपाडामार्गेच जावे लागते. रेवस-करंजा पूल झालातर हा वळसा घालाव लागणार नाही.
अलिबाग तालुक्यात आनेक प्रकल्प येऊ घातले होते. पंरतु त्याला विरोध करण्यात आला. वास्तविक रेवस-करंजा पुल होण्यासाठी सर्वानीच प्रयत्न करायाल हवे होते. परंतु मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया अशी प्रवासी जलवाहतु सरु झाल्यामुळे रेवस बंदाराच्या विकासाचा व रेवस-करंजा पुलाचा विषय मागे पडला. धरमतर खाडीच्या बाजूने काही खाजगी बंदर उभारण्यात येणार होती. त्यात एका सुक्या गोदीचा देखील समावेश होता. त्यांच्या मालवाहू जाहाजांच्या वाहतुकीला अडथळा होईल म्हणूल काही झारीतल्या शुक्राचार्यांनी हा पुला होऊनये यासाठी प्रयत्न केले. एरवी विकासाच्या बाता करणारे या पुलाचा विषय काढत नहित.
1970 पासून या पुलाच्या कामाची चर्चा सुरु होती. 1980 मध्ये पुलाचे काम सुरु झाले. तर 1982 मध्ये पुलाचे काम बंद पडले ते कायमचे. या पुलाची मागणी पन्नास वर्षांपासून होत आहे. पुलाचे काम थांबून 40 वर्ष झाली. मधलल्या काळात याकडे जाणूनबूजनू दुर्लक्ष करण्यात आले. बॅ. ए. आर. अंतुले यांचे मुख्यमंत्रीपद गेल्यांनतर हा विषय चेर्चेत यालयाल देखील 2013 साल उजाडले. मधुकर ठाकूर, प्रशांत ठाकूर यांनी आपल्या परीन प्रयत्न केले. आता अलिबागचे आमदार महेद्र दळवी यांनी या पुलासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबईतील शिवडी ते रायगड जिल्ह्यातील उरणमधील न्हावा शेवा दरम्यान सागरी सेतू बांधण्याचे काम जोमाने सुरु झाले आहे. हा प्रकल्प येत्या येत्या काही वर्षात मार्गी लागणे अपेक्षित आहे. त्यामुळे नवीमुंबई तून मुंबईत पोहोचणे सहज शक्य होईल. या सोबतच करंजा ते रेवस या पुलाचे काम पुर्ण झाल्यास अलिबाग ते मुंबई असा प्रवासही गतीमान होऊ शकेल.त्याचबरोबर अलिबाग तालुक्याचा विकास होण्यास देखील मदत
होणार आहे.
रेवस-करंजा पूल सुरू झाल्यास वाशी ते रेवस हे अंतर 39 कि. मी. कमी होईल.वाशी ते मांडवा हे अंतर 39 कि. मी., उरण – अलिबाग अंतर 44 कि.मी.ने, जेएनपीटी-अलिबाग अंतर 35 कि. मी. ने तर जेएनपीटी – मुरूड अंतर 36 कि. मी.ने कमी होईल. अलिबाग – मुबई प्रवास करण्यासाठी मुबई-गोवा महामार्गाने प्रवास कारावा लागातो. हे अंतर देखील या पुलामुळे कमी होणार आहे. हे पूल पूर्ण झाल्यावर अलिबाग मुबईच्या आणखी जवळ येईल. त्यामुळे हा पुल होणे महत्वाचे आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करता रेवस – करंजा पुल व्हायलाचा हवा. ती काळाची गारजा आहे. -प्रकाश सोनवडेकर