Breaking News

आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहा -आमदार प्रशांत ठाकूर

खोपोली : प्रतिनिधी
भाजपच्या कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहावे. सध्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी प्रचार करीत असलो तरी आगामी खोपोली नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्ष कार्यकर्त्यांना जनतेपर्यंत जाण्याची संधी आल्याचे प्रतिपादन भाजपचे मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते शुक्रवारी (दि. 21) खोपोली येथे आयोजित बैठकीत बोलत होते.
कोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ आढावा बैठकीचे आयोजन खोपोलीतील लोहाणा समाज हॉलमध्ये करण्यात आले होते. या बैठकीस व्यासपीठावर उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस दीपक बेहेरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, सनी यादव, जि.प.चे माजी सभापती नरेश पाटील, तालुकाध्यक्ष मोरे, शहराध्यक्ष रमेश रेटरेकर, राहुल जाधव, अजय इंदुलकर, माजी नगरसेवक सूर्यकांत देशमुख होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी खोपोली शहर व नंतर खालापूर तालुकानिहाय आढावा बैठक घेतली व कार्यकर्त्यांना उपयुक्त सूचना केल्या. प्रारंभी दीनदयाळ उपाध्याय व श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
या बैठकीला महिला मोर्चा शहर अध्यक्ष अश्विनी अत्रे, समती महर्षी, अनिता शाह, अपर्णा साठे, सुनिता पाटणकर, भाजप शहर चिटणीस सुनील नांदे, विकास खुरपुडे, विनायक माडपे, वैद्यकीय सेलचे डॉ. बबन नागरगोजे, डॉ. अनिकेत पाटील यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply