पनवेल : प्रतिनिधी
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त संघाच्या पत्रकार भवनातील सभागृहात शुक्रवारी (दि.21) साहित्यिक रामदास फुटाणे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी रायगडचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना विशेष सन्माननीय सदस्यत्व देण्यात आले.
या वेळी आपल्या भावना व्यक्त करताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, तुम्ही मला मुंई मराठी पत्रकार संघाचे अधिकृत सदस्यत्व दिलेत याचा मला फार मोठा आनंद झाला आहे कारण अनेक पत्रकारांशी माझा संंध येत होता, पण तो ाहेरून येत होता. माझ्याशी संंधित असलेल्या पत्रकारांनी मला वृत्तपत्र काढण्याचा सल्ला दिला. त्यामुळेच दैनिक रामप्रहर सुरू केले. आज या संघाचे विश्वस्त असलेले देविदास मटाले त्याचे संपादक आहेत. मला पनवेलमध्ये पत्रकार मित्र म्हटले जाते. मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे साहेब आणि माझ्या नेहमी भेटी होत असतात. लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंई मराठी पत्रकार संघ यांचेमार्फत गेले अनेक वर्ष राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा घेण्यात येते. नरेंद्र वाबळे साहे यांनी सूचवल्याप्रमाणे येथील दुरूस्तीचे काही काम मी करून दिले आहे. आता लोणावळ्याला असलेल्या विश्रामधामाचे काम त्यापेक्षा जास्त खर्च करून मी लवकरच पूर्ण करून देईन. मला आपण सदस्यत्व दिल्याबद्दल मी आपणासर्वांचा आभारी आहे.
विविध पुरस्कारांत पद्मश्री यमुनाताई खाडिलकर स्मृर्ती पुरस्कार पंकज दळवी, कविवर्य प्रा. भालचंद्र खाडिलकर स्मृर्ती पुरस्कार प्रमोद तेंडुलकर, समतानंद अनंत हरि गद्रे पुरस्कार विजयकुमार बांदल, वृत्तछायाचित्रकार संतोष बने, सीताराम रावकर स्मुर्ती पुरस्कार लता राजे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
Check Also
पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …