Breaking News

पनवेल मनपा हद्दीत विकासकामे

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिका हद्दीमध्ये अनेक विकासकामे करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत धानसर, करवले, नावडे, किरवले, सागाचीवाडी, वाघाचीवाडी, टेंभोडे येथील विविध कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 20) करण्यात आले.

पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 1 अंतर्गत धानसर व करवले गावात बोरिंगचे पाणी शुद्ध करण्यासाठी आरओ प्लान्ट बसविण्यात आला आहे. या पाण्याच्या टाक्यांचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रमाणे किरवले येथे स्मशानभूमीचे, नावडे येथे रस्त्याला पेव्हर ब्लॉक बसविण्याचे, सागाचीवाडी, वाघाचीवाडी व टेंभोडे या गावांमध्ये रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. या कामांबद्दल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला, तसेच महापालिका व नेतेमंडळींचे आभार मानले. या कार्यक्रमांना आरपीआयचे कोकण अध्यक्ष जगदिश गायकवाड, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, प्रभाग समिती ‘ब’ अध्यक्ष संजय भोपी, नगरसेवक संतोष भोईर, निलेश बाविस्कर, महादेव मधे, भाजप तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, तळोजा शहर अध्यक्ष निर्दोष केणी, तालुका चिटणीस चाहूशेठ पाटील, युवा मोर्चा महापालिका अध्यक्ष दिनेश खानावकर, माजी सरपंच नंदू म्हात्रे, संतोष पाटील, संतोष मढवी, अशोक गडगे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply