पनवेल : रामप्रहर वृत्त
अखंडपणे समाजोपयोगी उपक्रमे राबविणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, भारतीय जनता पक्ष, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 4) विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी या महाशिबिराचे आयोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने यंदा हे 16वे महाशिबिर आहे.
पनवेलमधील खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार्या या महाशिबिरात सर्वसाधारण रोग तपासणी, बालरोग तपासणी, महिलांचे आजार, त्वचारोग तपासणी, हृदयरोग तपासणी, दंतरोग तपासणी, मधुमेह तपासणी, नाक, नाक व घसा तपासणी, हाडांचे रोग तपासणी, कर्करोग तपासणी, क्षयरोग तपासणी, होमिओपॅथिक तपासणी, आयुर्वेदिक तपासणी, सर्व प्रकारच्या रक्त तपासणी तसेच नेत्र तपासणी व चष्मेवाटप, कृत्रिम हात व पाय बसविणे अशा विविध आरोग्य तपासण्यांसह तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचार देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आयुष्यमान भारत डिजिटल कार्ड तयार करून देण्यात येणार असून महात्मा फुले योजनेंतर्गत आधारकार्डला लिंक करून देण्याचीही सुविधा या ठिकाणी असणार आहे. या वेळी दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार असून अवयदानाचे फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.
या महाशिबिराचा दरवर्षी 15 हजारहून अधिक नागरिक लाभ घेत असतात. प्रत्येक शिबिरार्थीला योग्य सेवा मिळाली पाहिजे त्या अनुषंगाने नियोजनात कोणतीही कसर राहू नये यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या असून महाशिबिरासंदर्भात अधिक माहितीसाठी डॉ. अरुणकुमार भगत (9223505555) किंवा अनिल कोळी (9769409161) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी केले आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …