इनामपुरी (खारघर) : साक्षी स्टार इंटरप्रायजेसच्या वतीने दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा समारोप शनिवारी झाला. या वेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन गौरविले. भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी व अन्य सोबत होते.