Breaking News

छात्रभारतीकडून मजुरांना मदतीचा हात

मोहोपाडा ः प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची उपासमार होऊ नये यासाठी छात्रभारती पुढे येऊन काम करीत आहे. मोहोपाडा (नवीन पोसरी) येथे आतापर्यंत छात्रभारतीच्या वतीने 30 कष्टकरी मजुरांना व कुटुंबीयांना 218 किलो तांदूळ, 218 किलो आटा, 90 लिटर तेल, 70 किलो डाळ, 60 किलो बटाटे, 34 किलो कांदे, 25 किलो मीठ आदी अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या वेळी रायगड छात्रभारतीचे जितेश किर्दकुडे, मिहीर दोषी आणि शिक्षक भारतीचे मंदार वेदक यांनी शासनाचे नियम काटेकोरपणे पाळत रसायनी विभागातील गोरगरीब कुटुंबांना किराना सामानाचे वाटप केले.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply