Breaking News

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभेचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील जाणीव एक सामाजिक संस्थेच्या वतीने शनिवारी (दि. 3) दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत पनवेल शहरातील आगरी समाज हॉल येथे भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
ज्युनिअर केजी ते पहिली, दुसरी ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावीपर्यंत अशा चार गटात ही स्पर्धा होणार आहे. नाव नोंदणीची अंतिम तारीख 30 जुलै असून स्पर्धेचे साहित्य (कंपास पेटी, पेन्सिल, कलर ई.) प्रत्येक स्पर्धकाने स्वतःचे आणावे. स्पर्धकाला स्पर्धेच्या ठिकाणी चित्रकला पेपर व चित्राचा विषय देण्यात येणार असून प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र व भेटवस्तू तसेच विजेत्या स्पर्धकाला मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व आकर्षक बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी प्रसाद कंधारे (8451842919), महेश सरदेसाई (8454042919), प्रसाद हनुमंते (7666327009), परेश बोरकर (9987331998), शैलेश कदम (9320209991), राजा चव्हाण (9987332213), सचिन नाझरे (9819676518) किंवा विनीत मढवी (7506578193) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन स्पर्धेचे आयोजक व जाणीव एक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस, माजी नगरसेवक नितीन पाटील यांनी केले आहे.

Check Also

25 एकांकिका राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य …

Leave a Reply