आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती
पनवेल ः रामप्रहर वृत्त
आर्च इंटरप्रायझेस आयोजित सुधीर फडके अर्थात बाबुजी यांच्या लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेल्या गाण्यांचा स्वरोत्सव बाबुजी महोत्सव शनिवारी (दि. 27) पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली.
या महोत्सवात सुधीर फडके अर्थात बाबुजी यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली अजरामर गीते गायक डॉ. जय आजगावकर, मंदार आपटे, अर्चना गोरे आदींनी सादर केली, तर ज्येष्ठ संगीतकार, गायक आणि स्व. सुधीर फडके यांचे पुत्र श्रीधर फडके यांनी विशेष सादरीकरण केले. कार्यक्रमाचे निर्माता विनीत गोरे तसेच सूत्रसंचालक सुकन्या जोशी, श्रेयसी वझे या होत्या.
आमदार प्रशांत ठाकूर महोत्सवाला भेट देत स्व. सुधीर फडके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच सर्व कलाकारांचे कौतुक केले. त्यांच्यासमवेत भाजप सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड जिल्हा संयोजक अभिषेक पटवर्धन, सहसंयोजक गणेश जगताप, पनवेल शहर संयोजक वैभव बुवा आदी उपस्थित होते.