पनवेल ः रामप्रहर वृत्त
युवकांच्या समस्यांची जाण असलेले कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. 3) दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या रोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध होणार असून इयत्ता पाचवी ते पदवीधर शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना या माध्यमातून हजारो रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी https://prashantthakur.jobfairindia.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करता येणार असून अधिक माहितीसाठी 9920765765 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Check Also
नमो चषक स्पर्धेला लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत शानदार सुरुवात
पनवेल : रामप्रहर वृत्तशिवाजी पार्क व आझाद मैदान हे राज्याच्या दृष्टिकोनातून मुंबईतील अत्यंत महत्त्वाची अशी …