पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वनविभागाच्या जागेसंदर्भात विकासकामांच्या अनुषंगाने परवानगी व तत्सम विषयावर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 4) बैठक झाली. या वेळी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ना. गणेश नाईक यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना आश्वासित केले.
पनवेल महापालिका क्षेत्रात अमृत अभियान अंतर्गत पाणीपुरवठा आणि मलनिःसारण योजनेची कामे प्रगतिपथावर आहेत. या योजनेतील जलवाहिनी, मलवाहिनी अंथरणे तसेच मलनिःसारण केंद्र बांधण्याकरिता जागेची आवश्यकता आहे तसेच बांधकाम विभागांतर्गतदेखील रस्ते क्राँकीट करणे, गटार, स्मशानभूमी, संरक्षक भिंत आणि नवीन रस्ते तयार करण्याची कामे वन विभागांतर्गत येत आहेत. त्यामुळे विकासकामे करण्यासाठी समस्या उद्भवत असून नागरिकांना सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. हे विषय मार्गी लावण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने मंत्रालयात वनमंत्री गणेश मंत्री यांच्यासोबत गुरुवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी पनवेल महापालिका क्षेत्रातील वनविभागाच्या जागेसंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीला महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. वनमंत्री गणेश नाईक यांनी बैठकीला सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
Check Also
‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम
दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …
RamPrahar – The Panvel Daily Paper