Breaking News

…तोपर्यंत नैना प्रकल्पाची वीटदेखील ठेवू देणार नाही

आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्वाही

पनवेल : रामप्रहर वृत्त
जोपर्यंत सर्वांच्या शंकांचे निरासन होत नाही तोपर्यंत नैना प्रकल्पाची वीटदेखील ठेवू देणार नाही, अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी चिपळे येथे जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी दिली तसेच भाजपची विकासात्मक भूमिका सर्वसामान्य जनतेमध्ये पोहचवून विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार पुन्हा निवडून देण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून अनेकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात पहावयास मिळत आहे. या अनुषंगाने तालुक्यातील चिपळे येथे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 21) झाले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्ष जनसामान्यांमध्ये मिळून काम करणारा पक्ष आहे. आज सुरू झालेल्या या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांना आपल्या समस्या सोडवण्यासाठी एक हक्काचे ठिकाण उपलब्ध झाले आहे. त्यामुळे मला खात्री आहे निवडणुकीनंतरदेखील संपूर्ण परिसरातील लोकांना सेवा देणारे केंद्र बनून हे कार्यालय काम करेल. या वेळी विरोधकांच्या खोट्या अफवांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.
या कार्यालयाच्या उद्घाटन समारंभास भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, भाजप तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच अनंत ढवळे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजीत पाटील, हनुमान फुलोरे, अशोक फुलोरे, रूपेश फुलोरे, गिरीश फुलोरे, बूथ अध्यक्ष भास्कर फुलोरे, कल्पेश फुलोरे, किशोर फुलोरे, गणेश फुलोरे, राजेश फुलोरे, हरिदास फुलोरे, गणेश फुलोरे, धीरज फुलोरे, अमोल फुलोरे, लहू फुलोरे, रमेश फुलोरे, दत्ता फुलोरे, माजी सरपंच रमेश पाटील, माजी सदस्य गणेश म्हसकर, माजी उपसरपंच धनंजय पाटील, रोशन पाटील, महेश शाह, नागेश म्हसकर, हभप धनाजी म्हसकर, आकाश पाटील, कुलदीप पाडवी, विवेक पांडेय, रोहित पाटील, चंद्रकांत राणे, अनुराग पांड्या, सुनील फडके, समाधान फडके, रूपेश फडके, कान्हा फडके, अनंता फडके, मंगेश फडके, दीपक फडके, समीर पाटील, दुशांत पवार, सुनील पाटील, भरत पाटील, नामदेव पाटील, साईनाथ पाटील, दिनकर पाटील, सागर पाटील, संदेश फडके, भावेश फडके, अभिनय पाटील, नितीन पाटील, अक्षय पाटील, स्वप्नील फडके, समीर पाटील, विजय पाटील, विशाल पाटील, तुकाराम पाटील, तन्मय पाटील, सुभाष पाटील, शरद म्हस्कर, सचिन पाटील, प्रतिक पाटील, प्रतीक फडके, प्रनिल फडके, प्रसाद पाटील, निलेश पाटील, नारायण पाटील, महेंद्र पाटील, किरण पाटील, सौरभ पाटील, योगेश पाटील, दिनकर पाटील, धीरज म्हात्रे, अविनाश म्हात्रे, संजय पाटील, रोहित पाटील, विठ्ठल पाटील, हौशिराम फडके, हरिश्चंद्र पाटील, हरिश पाटील, अजित म्हात्रे, विष्णू पाटील, रवी पाटील, नरेश पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भोकरपाडा गावातील शाखाप्रमुख गजानन फुलोरे, अनिकेत फुलोरे, अभिजित फुलोरे तसेच विहिघरमधील रहिवासी तथा विरार येथील ‘उबाठा’चे शाखाप्रमुख विश्वनाथ कांबळे यांनी भाजपमध्ये सहभागी होत पक्षाची ताकद अधिक मजबूत केली. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वागत करून आपला निर्णय सार्थ ठरले असे काम भाजपच्या माध्यमातून होईल, असा विश्वास त्यांना दिला.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply