पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात शनिवारी (दि.31) पत्रकार संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पत्रकारांशी मनमोकळी बातचीत केली आणि आपल्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण प्रसंगांना उजाळा दिला. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील अनुभवांबद्दल त्यांनी या वेळी संवाद साधला.
कार्यक्रमादरम्यान, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार विजय पवार संपादीत रायगड प्रभात वृत्तपत्राच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या विशेष अंकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी.देशमुख, अमोघ ठाकूर, आदेश ठाकूर यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा आणि योगदानाचा गौरव करण्यात आला. पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
Check Also
केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper