Breaking News

खांदा कॉलनीत मान्सूनपूर्व कामांना वेग

उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक एकनाथ गायकवाड यांनी केली पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल शहरातील खांदा कॉलनी परिसरात विविध मान्सूनपूर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांसाठी उपमहापौर सीताताई पाटील आणि नगरसेवक एकनाथ गायकवाड यांनी सातत्यपुर्ण पाठपुरावा आणि पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून अखेर मॉन्सूनपूर्व कामे सुरू झाली आहेत.

पावसाळा अगदी तोंडावर आला असताना सिडको प्रशासनाकडे मान्सूनपूर्व कामांसंदर्भात उपमहापौर सीताताई पाटील अणि नगरसेवक एकनाथ गायकवाड यांनी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. अखेर प्रशासनाने याची दखल घेत मान्सूनपूर्व कामांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. खांदा कॉलनीमधील सेक्टर 8 आणि 12 येथील रस्त्याची दुरवस्था झाली होती. पाठपुराव्यानंतर येथील रस्त्याची कामे सुरू झाली आहेत. याचबरोबर नालेसफाई, विभागातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण, वाढलेल्या झाडांची छाटणी यासारख्या कामांना अखेर मुहूर्त मिळाला असून, नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

या कामांची उपमहापौर सीताताई पाटील आणि नगरसेवक एकनाथ गायकवाड यांनी सिडको अधिकारी यांच्यासोबत पाहणी करून आढावा घेतला आणि कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

Check Also

युवा नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत हेल्मेट वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्तभाजपचे युवा नेते, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक परेश …

Leave a Reply