Breaking News

चिंध्रण ग्रामपंचायतीमधील ‘उबाठा’, शेकापचे ग्रामपंचायत सदस्य भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त
चिंध्रण विभागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शेतकरी कामगार पक्षाला धक्का बसला असून भाजपने या विभागात आपली घोडदौड अधिक वेगवान केली आहे. ग्रामपंचायत सदस्यांचे कुटुंबीय आणि शेकापचे माजी सदस्य यांनी भाजपमध्ये प्रवेश करून चिंध्रण परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये बदल घडवून आणला आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पाले खुर्द येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. या वेळी ‘उबाठा’चे ग्रामपंचायत सदस्य जीवन पाडेकर यांच्यासह वडील मधुकरशेठ पाडेकर, ग्रामपंचायत सदस्य कुसुम आत्माराम पाटील, त्यांचे पती आत्माराम पाटील यांनी तसेच शेकापचे नेते माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 7) विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले.
पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेली रस्ते, पाणीपुरवठा, गावस्तरावरील मूलभूत व शैक्षणिक सुविधा आणि दीर्घकालीन विकास योजनांची अंमलबजावणी यामुळेच आम्ही भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे नव्या सदस्यांनी स्पष्ट केले.
या वेळी प्रवेशकर्त्यांचे स्वागत करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, भाजपमध्ये येणारे प्रत्येक कार्यकर्ते आमच्यासाठी बळ देणारे ठरतात. चिंध्रण विभागाच्या विकासासाठी अनेक प्रकल्प सुरू आहेत. आगामी काळात आणखी सुविधा, रोजगाराच्या संधी आणि पायाभूत कामांवर लक्ष केंद्रित करून हा भाग विकसित करणार आहोत.
कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, एकनाथ देशेकर, कृष्णा पाटील, माजी जि.प. सदस्य अमित जाधव, पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, माजी नगरसेवक गणेश कडू, रवींद्र भगत, प्रकाश खैरे, सरस्वती काथारा, माजी सरपंच कमला देशेकर, वासुदेव पाटील, राम पाटील, महेश पाटील, अशोक पाटील, नकुल जोशी, विशाल खानावकर, अरविंद गोंधळी, कैलास मढवी, बाळू काटे, नवनाथ पाटील, नितेश पाटील, अंकुश ढोंबरे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, तालुका सरचिटणीस विश्वजीत पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply