नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
नवरात्रीनिमित्त दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय, इंग्रजी माध्यमात मंगळवारी (दि. 12) सप्तमीला सरस्वती पूजन करण्यात आले. पर्यवेक्षिका निरजा मॅडम यांनी सरस्वतीची पूजा केली. तर सर्व शिक्षकांनी दीपप्रज्वलन करून देवीला वंदन केले.
कार्यक्रमाची सुरूवात जिनल वालावलकर हिने दुर्गा सुक्त गाऊन केले. स्वराज चव्हाण या विद्यार्थ्याने नवरात्रीविषयी माहिती सांगितली. श्रावणी थळे हिने सुंदर नृत्य केले. पर्यवेक्षिका निरजा मॅडम यांनी नवरात्र साजरा करण्यामागचा उद्देश विद्यार्थ्यांना सांगुन नवरात्रीचे महत्त्व विषद केले. शिक्षकांनी महिषासूर मर्दिनी स्तोत्र आणि महालक्ष्मी अष्टक म्हटले.
सर्व विद्यार्थ्यांनी सरस्वती देवीचे आशीर्वाद घेतले. कोरोना नियमांचे काटेकोर पालन करत अतिशय मंगलमय वातावरणात हा कार्यक्रम सादर केल्याबद्दल मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
जिनल वालावलकर हिने उत्कृष्ट सुत्रसंचालन करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.