६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी, पनवेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारो उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शनिवारी (दि. ८) चांगू काना ठाकूर महाविद्यालय, खांदा कॉलनी येथे झालेल्या या मेळाव्यात तब्बल ६४ नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतल्याने रोजगाराच्या विविध क्षेत्रांतील संधी उमेदवारांसाठी उपलब्ध झाल्या.
भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या महारोजगार मेळाव्यात दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवारांपासून आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर तसेच विविध कौशल्ये असलेल्या उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सकाळपासूनच मेळाव्याच्या ठिकाणी युवक-युवतींची मोठी गर्दी पाहायला मिळाली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याचे उद्घाटन पनवेलचे महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते झाले.
मेळाव्यास ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक व नगरसेवक परेश ठाकूर, उपमहापौर प्रमिला पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, प्रल्हाद केणी, नगरसेवक दशरथ म्हात्रे, रवींद्र भगत, राजू सोनी, डॉ. अरुणकुमार भगत, अजय बहिरा, समीर ठाकूर, एकनाथ गायकवाड, मधू पाटील, प्रवीण पाटील, अमर पाटील, विकास घरत, नगरसेविका प्रतिभा भोईर, सीता पाटील, जिल्हा परिषद सदस्या कमला देशेकर, पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, काशिनाथ पार्टे, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक संजय भगत, स्वप्निल ठाकूर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, ॲड. चेतन जाधव, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, कामगार नेते जितेंद्र घरत, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाईक, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, भाजपचे शहर चिटणीस रुपेश नागवेकर, ओबीसी सेलचे राजेश गायकर, रामनाथ पाटील, डॉ. संतोष आगलावे, युवा मोर्चाचे नवीन पनवेल अध्यक्ष मयूर कदम, पनवेल शहर अध्यक्ष हिमेश बहिरा, चिन्मय समेळ, अक्षय सिंग, विश्वजीत पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांच्या करिअरला योग्य दिशा देणे, या उद्देशाने भविष्यातही अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी स्पष्ट केले. ६४ कंपन्यांच्या सहभागामुळे विविध उद्योग आणि रोजगार क्षेत्रांतील संधी एकाच छताखाली उपलब्ध झाल्या. यामध्ये २५०२ उमेदवारांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांशी थेट संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि अनुभवाच्या आधारे विविध पदांसाठी मुलाखती घेतल्या. त्यामुळे अनेक उमेदवारांना रोजगाराच्या संधींसोबतच करिअरविषयक मार्गदर्शन आणि उद्योग क्षेत्रातील आवश्यक कौशल्यांची माहिती मिळाली.
मेळाव्यात भारत इलेक्ट्रॉनिक्स, असाही इंडिया ग्लास लिमिटेड, युनिकेअर हेल्थकेअर, इकोशाईन फॅसिलिटी सोल्युशन्स एलएलपी, आयपीएस ग्रुप्स, पटेल ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, सदरलँड, लिशियस, फॉर्च्यून सिम्बॉलॉजी रिसर्च सेंटर, युवाशक्ती स्किल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, क्युअरफूड्स, एनआयआयटी फाउंडेशन, सिमरन मोटर्स, ॲक्सिस बँक, वाशी इंटिग्रेटेड सोल्युशन्स, टाटा स्ट्राइव्ह, झेप्टो, ब्लूमबे एंटरप्रायझेस, डिजिटाइड सोल्युशन्स, १ पॉइंट १, प्रशांत कॉर्नर प्रायव्हेट लिमिटेड, सोडेक्सो इंडिया सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, आर पॉवर, इंजेनिक्स, यूएम सर्व्हिसेस, एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस, एसबीआय कॅप सिक्युरिटीज, महिंद्रा इंटिग्रेटेड बिझनेस सोल्युशन्स, मुथूट फायनान्स लिमिटेड, एस. एच. केलकर, नेटटेक इंडिया, क्वेस कॉर्प लिमिटेड, टॅलीउन्नती इन्फो सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, शेट्टी इन्फ्रासर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, अरकॅश इंडिया एलएलपी, ऑटोबान ट्रकिंग कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड, एसके ग्रुप, डीआरएस अर्थवर्क प्रायव्हेट लिमिटेड, पॅराडाइम आयटी टेक्नॉलॉजीज सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, झेनिथ्रा ग्लोबल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, द अक्षय पात्र फाउंडेशन, कोटक बँक लिमिटेड, मेरिट्यूड स्किल डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड, केमस्पेक केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, आईसबर्ग इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड, व्ही-इन्शुअर फार्मा प्रायव्हेट लिमिटेड, श्री टेक्नोक्रॅट कम्युनिकेशन सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड (एसटीसीएस), अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, वॉट्स व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड, अमुवा कॉर्पोरेशन, रेडविंग मॅनेजमेंट फॅसिलिटेटर्स प्रायव्हेट लिमिटेड, गार्गी हटेन्स अल्बर्टस प्रायव्हेट लिमिटेड, ग्लोबवर्क इन्फोटेक, टाइम्सप्रो (टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप), एनआयआयटी लिमिटेड आयएफबीआय, आयडीबीआय इन्फोटेक लिमिटेड, बीटीडब्ल्यू फायनान्शियल सर्व्हिसेस अँड आयएमएफ प्रायव्हेट लिमिटेड, प्रोव्हॅल्यू बिझनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, आयप्रोसेस सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड, पीपल लॅब ॲडव्हायजरी, स्मार्टटेक बिझनेस मॅनेजमेंट, मायवे टेक्नॉलॉजीज, कोडर टेक्नॉलॉजीज आदी कंपन्यांचा सहभाग होता.
या मेळाव्याचे अत्यंत नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध आयोजन करण्यात आले होते. उमेदवारांची नोंदणी, कंपन्यांची माहिती, मुलाखतीसाठी स्वतंत्र व्यवस्था, मार्गदर्शन कक्ष तसेच उमेदवारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. हजारो उमेदवारांची उपस्थिती असूनही संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. आयोजक, स्वयंसेवक आणि संबंधित कार्यकर्त्यांच्या समन्वयामुळे मेळाव्याचे उत्तम नियोजन पाहायला मिळाले. आजच्या स्पर्धात्मक युगात युवकांना केवळ शिक्षणच नव्हे तर त्यांच्या कौशल्याला योग्य रोजगाराची संधी मिळणे अत्यंत गरजेचे आहे. ही गरज लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यामुळे पनवेल आणि परिसरातील युवकांना रोजगार, करिअर आणि उद्योग क्षेत्राशी थेट जोडले जाण्याचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध झाले. यावेळी सहभागी झालेल्या उमेदवारांनी मेळाव्याच्या आयोजनाचे आणि उपलब्ध करून देण्यात आलेल्या रोजगाराच्या विविध संधींचे कौतुक केले.
३२३ जणांची ‘ऑन द स्पॉट’ निवड
महारोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रांतील तब्बल ६४ नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. विविध पदांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्याने सुमारे २५०२ उमेदवारांनी नोंदणी करून प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. मुलाखतीतून १,२३७ उमेदवारांची पुढील फेरीसाठी निवड करण्यात आली, तर ३२३ उमेदवारांची जागेवरच ‘ऑन द स्पॉट’ निवड करण्यात आली. त्यामुळे अनेक युवक-युवतींना मेळाव्याच्या माध्यमातून थेट रोजगाराची संधी मिळाली आहे. मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक असून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना मुलाखतीचे प्रशिक्षण देण्याचाही प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला, अशी माहिती आयोजन समिती प्रमुख ॲड. चेतन जाधव यांनी दिली.
मुलाखतीसाठी विशेष मार्गदर्शन
रोजगार मेळाव्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांना केवळ रोजगाराच्या संधी उपलब्ध करून न देता मुलाखतीला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी विशेष मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले. मुलाखतीच्या वेळी स्वतःची ओळख कशी करून द्यावी, आत्मविश्वासाने प्रश्नांची उत्तरे कशी द्यावीत, आपल्या कौशल्यांची मांडणी कशी करावी, तसेच कंपनीच्या अपेक्षा समजून घेऊन मुलाखतीची तयारी कशी करावी, याबाबत उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनीदेखील मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांशी संवाद साधून त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. रोजगाराच्या संधींचा योग्य पद्धतीने उपयोग करून घेण्यासाठी आत्मविश्वासाने मुलाखतीला सामोरे जाणे, आपल्या कौशल्यांवर विश्वास ठेवणे आणि उपलब्ध संधींचे सोने करणे याबाबत त्यांनी उमेदवारांना प्रोत्साहित केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
युवकांसाठी रोजगाराचे प्रभावी व्यासपीठ
पनवेल परिसरातील अनेक युवक-युवती शिक्षण पूर्ण करून रोजगाराच्या संधींच्या शोधात असतात. कंपन्यांमध्ये उपलब्ध असलेल्या विविध रोजगाराच्या संधी आणि स्थानिक युवक यांच्यात थेट समन्वय साधण्याचे काम या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आले. त्यामुळे उमेदवारांना विविध कंपन्यांमध्ये एकाच ठिकाणी अर्ज करण्याची आणि मुलाखती देण्याची संधी मिळाली.
या मेळाव्यामुळे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच कंपन्यांनाही आवश्यक मनुष्यबळ शोधणे सुलभ झाले. स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले.महारोजगार मेळाव्याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पनवेल परिसरातील युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधींचे दालन खुले झाले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper